अनिल कपूर होणार आजोबा, सोनमने दिली गुड न्यूज

By  
on  

बॉलिवूडचे डॅशिंग आणि हॅण्डसम हंक अभिनेते अनिल कपूर यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर हे आजोबा होणार आहेत. बॉलिवूडची फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. पती आनंद  अहुजा यांच्यासह मॅटर्निटी फोटोशूट करत तिने सोशल मिडीयावरुन ही बातमी चाहत्यांना दिली. 

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सोनमने पती आनंद अहूजासोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केले. फोटोमध्ये सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आनंदच्या मांडीवर डोक ठेवून असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सोनमचा बेबी बंपही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत सोनमने एक कवीता शेअर केली आहे. शेवटी तुझ्या येण्याची आता प्रतिक्षा करू शकत नाही असं सोनम म्हणाली. सोनम आणि आनंदचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

चाहत्यांनी सोनमच्या .या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share