By  
on  

आलियाने शेयर केले लग्नातले खास क्षण, रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडने केली ही कमेंट

रणबीर कपूर-आलिया भट ह्या बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कपलचा शाही लग्नसोहळा काल १४ एप्रिलरोजी मुंबईत पार पडला. लग्नानंतर लगेचच आलियानं या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत दोघावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण यात एका कमेंटने मात्र लक्ष वेधलं ते म्हणजे रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफच्या कमेंटने. तिच्या कमेंटची चर्चा रंगली आहे. 

 ‘आज आमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या समोर, आमच्या घरी… बाल्कनीतील आमच्या आवडत्या ठिकाणी… जिथे आम्ही पाच वर्षे एकमेकांसोबत व्यतित केली त्याच ठिकाणी आज आम्ही लग्न केले. या जागेसोबत आमच्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि भविष्यातही अनेक आठवणी जोडल्या जातील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया.’ असं कॅप्शन आलियाने या अमूल्य क्षणांच्या फोटोंना दिलं आहे. यावर जेनिलिया डिसूझा, वाणी कपूर , माधुरी दीक्षित, अनिल कपूर, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, दीया मिर्झा, सोनू सूद आदी सर्वांनी कमेंट करुन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt

 

 

 

आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना कतरिनानं कमेंट केली आहे. तिने लिहिलं, ‘तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. खूप सारं प्रेम, मी तुमच्या आनंदाची कामना करते. तुमचं आयुष्य आनंदानं बहरुन जावं हीच इच्छा.’ एकेकाळी रणबीर कपूरची गर्लफ्रेंड असेल्या कतरिना कैफची आलियाच्या फोटोवरील ही कमेंट सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive