आदिवासी वेशभूषेची मजा घेणं राखी सावंतला पडलं महागात, गुन्हा दाखल

By  
on  

राखी सावंत ही आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोव-यात ती सतत अडकते. नुकतंच तिचं एक नंव प्रकरण समोर आलं आहे.. राखी सावंतनं बेली डान्सला आदिवासी पोशाख असल्याचं सांगितलं होतं. समितीच्या मते आदिवासींचा पोशाख असल्याचं सांगत राखी सावंतनं अश्लिलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. वास्तविक राखी सावंत हिचं 'मेरे वरगा' हे नवीन गाणं रिलीज होणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी राखीनं हा ड्रेस घातला होता. तो ड्रेस आदिवासी वेशभूषा असल्याचं तिनं सांगितलं होतं.

सोशल मिडीयावर राखीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसंच तिला यावरुन बरंच ट्रोल करण्यात येतंय. रांची येथील एससी - एसटी पोलिस ठाण्यात राखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Recommended

Loading...
Share