By  
on  

सुनील ग्रोवरच्या शोमध्ये ‘सिंबा’च्या प्रमोशनसाठी आलेल्या रणवीरची चांगलीच टर

लग्नाच्या नवलाईचे दिवस सरल्यावर दिपिका आणि रणवीर आपापल्या कामाला लागले आहेत. रणवीर आगामी ‘सिंबा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे.
प्रमोशनसाठी रणवीर विविध शोजमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. त्यासाठी अलीकडेच रोहीत शेट्टीसोबत सुनील ग्रोव्हरच्या आगामी ‘कानपूरवाले खुरानाज’ शोच्या पहिल्या वहिल्या एपिसोड्समध्ये दिसून येत आहे.
या शोच्या दरम्यान थट्टामस्करीचे प्रकार सर्रास घडताना दिसून येत होते. पण सगळ्यात जास्त थट्टा उडवली गेली ती रणवीर सिंगची.

त्याचं झालं असं सुनील ग्रोव्हर आणि अभिनेता अपारशक्ती खुराणा यांनी दिपिकाच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील ‘एक चुटकी सिंदूर की किमत’ या डायलॉगवरून रणवीर सिंगची खूप मस्करी केली. याशिवाय रणवीरची लग्नातील घटनांवरूनही थट्टा केली. विशेष म्हणजे रणवीरने हे सगळं अगदी हसण्यावारी नेलं. रणवीर आणि रोहीत हे पहिल्यांदाच ‘कानपुरवाले खुरानाज’ या शो मध्ये आले आहेत. त्या दोघांनीही या शो मध्ये भरपूर धमाल केल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी सिंबा’चा ट्रेलर रिलिज झाला होता. या ट्रेलरला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरवर दिपिकाची प्रतिक्रिया रणवीरसाठी सगळयात खास होती.
दिपिकाला या ट्रेलरमध्ये रणवीर सगळ्यात हॉट वाटतो.

 

Recommended

PeepingMoon Exclusive