By  
on  

चीट इंडिया’ शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणार, इम्रान हाश्मी लक्षवेधी भूमिकेत

येत्या जानेवारीत शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा रिलीज होत असून त्यातून शिक्षण व्यवस्थेतील वाईट गोष्टी समोर येतील असं दिग्ददर्शकांना वाटतं.
विशेष म्हणजे या सिनेमात इम्रान हाश्मी नकारात्मक भूमिकेत असून ‘नकल मे ही अकल है’ ही टॅगलाईन त्याच्या तोंडी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मितीही इम्रान हाश्मीच करत आहे. एलिप्सिस एंटरटेनमेंट आणि टी सिरीज यांच्या भागीदारीतून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सिद्ध झाला आहे.
इम्रानच्या व्यक्तिरेखेचे नाव राकेश सिंग असं आहे. तो पैशासाठी काहीही करण्यासा तयार असलेल्या व्यक्तीची भूमिका यात साकारत आहे. या चित्रपटातून श्रेया धन्वंतरी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. आता इम्रान हाश्मीच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. आता या चित्रपटला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळतो ते कळेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive