By  
on  

साजिद खाननंतर आता नंबर ‘संस्कारी बाबूजीं’चा, ‘मीटू’ अंतर्गत होणार कारवाई

परदेशात सुरु झालेल्या ‘मीटू’ चळवळीचं लोण भारतात पोहोचलं आणि सभ्येतेच्या बुरख्याआड लपलेल्यांचा लालची चेहरा सगळ्यांसमोर आला.

या चळवळीने चमचमत्या दुनियेमागचं शोषणाचं वास्तवही जगासमोर आणलं. यात साजिद खान, आलोकनाथ यांच्यासारख्या प्रसिद्ध चेह-यांमागील कृष्णकृत्य जगाने पाहिली. या दोघांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडियन फिल्म्स अ‍ॅँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशने साजिद खानवर एकवर्षाची बंदी घातली आहे. साजिदने त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यानुसार असोसिएशनने कारवाई केल्याचं अध्यक्ष अशोक पंडित यांनी स्पष्ट केलं. तशीच कारवाई आलोकनाथ यांच्यावरही केली जाईल , हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘संस्कारी बाबूजी’ अशी इमेज असलेल्या आलोकनाथवर विनिता नंदा यांनी आरोप केले होते. तेव्हापासून अटकेच्या भितीने आलोकनाथ फरार झाले आहेत. ते कुठे आहेत याबद्द्ल कोणालाच काही माहिती नाही. त्यांचे कुटुंबियही याबद्द्ल विशेष माहिती देऊ शकत नाहीत. आलोकनाथ यांच्यावर विनिता नंदा यांच्या आरोपानंतर संध्या मृदुल, हिमानी शिवपुरी, रेणुका शहाणे यांनीदेखील आरोप केले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive