By  
on  

रितेश देशमुख पुन्हा एकदा व्हिलन, पाहायला मिळणार बुटक्या व्यक्तिरेखेत

अभिनेता रितेश देशमुख सध्या माऊलीमधून रसिकांसमोर आला आहे. मराठी सिनेमाचं शुटिंग संपल्यानंतर रितेश पुन्हा बॉलिवूडपटांकडे वळला आहे.रितेश आता मिलाप जवेरीच्या ‘मरजावां’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘एक व्हिलन’ या सिनेमाप्रमाणेच रितेश या सिनेमातही व्हिलनचा रोल साकारणार आहे.

 

या व्यक्तिरेखेची खासियत म्हणजे रितेश या ३ फुट ५ इंच उंची असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेशसोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.यापूर्वी सिद्धार्थ आणि रितेश यांनी एकत्रितपणे एक व्हिलन या सिनेमात काम केलं आहे. त्यावेळी त्यांची हिरो-व्हिलनची केमिस्ट्री लोकांना भावली होती. दिग्दर्शक मिलाप जव्हेरींच्या मते, हा सिनेमा डार्क कॉमेडी प्रकारचा असणार आहे.

उत्तम डायलॉगबाजी ही देखील या सिनेमाची जमेची बाजू असणार आहे. या सिनेमात रितेशची व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाईफ असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात रितेश आणि सिद्धार्थचे काही खास सीनदेखील असल्याचं दिग्दर्शक मिलाप जव्हेरींनी नमूद केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive