By  
on  

सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास पोचला 'बहुआ सिंह' शाहरुख

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील सारे मतभेद आता दूर झालेले दिसून येतात. कारण जेव्हा सलमानचा अपिअरन्स बहुआ सिंह बनलेल्या शाहरुखच्या झिरोमध्ये दिसला तेव्हाच प्रेक्षकांना समजून चुकलं होतं की हे दोन खान आता एकेमकांबरोबर चांगले जुळवून घेतायत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, शाहरुख खान सलमान खानच्या बिग बॉसच्या सेटवर नुकताच पोहचला. शाहरुख येण्यापूर्वीचं सलमानने आपल्या एपिसोडचं शूटींग पूर्ण करुन घेतलं होतं. कारण त्यालासुध्दा माहितीय की एकदा दोघ एकत्र आले की गप्पा-टप्पा आणि मस्तीत कसा वेळ जातो ते कळत नाही. त्यानंतर शाहरुख आल्यावर झिरो स्पेशल बिग बॉस एपिसोडच्या शूटींगला सुरुवात केली.

सुरूवातीला बिग बॉसमधील स्पर्धकांना बऊचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून सगळेच स्पर्धक खूप गोंधळले. या दरम्यान सुरभिने अंदाज लावत हा आवाज बऊचा आवाज असल्याचं सांगितलं.

यानंतर सलमान खानने शाहरूख खानची ओळख बऊआ म्हणून करून दिली. तेव्हा घरातील सर्व मंडळी गोंधळले. शाहरूख देखील यावेळी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी अगदी मनोसोक्त गप्पा मारत होता.

डान्स करताना शाहरूख खान आणि सलमान खान वेगळ्याच अंदाजात दिसले. दोन्ही कलाकार अगदी देसी अंदाजात गळ्यात गमझा घालून डान्स करताना दिसले. स्वतः किंग खानने हा फोटो सलमान खानला भाईजान संबोधत शेअर केला आहे. त्यामुळे दोघांमध्येही इश्कबाजी फिवर चांगलाच चढल्याचं पाहायला मिळालं.

https://www.facebook.com/IamSRK/photos/a.390738984285704/2972099446149632/?type=3&theater

 

शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमात सलमान खानचा कॅमिओ रोल देखील आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतंच या सिनेमातील इश्कबाजी या गाण्यामध्ये शाहरूख आणि सलमान एकत्र दिसत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive