By  
on  

पत्नी जिनीलियाने पती रितेश देशमुखला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बी- टाउनमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया डिसूझा देशमुख यांच्या प्रेमाचे दाखले आवर्जुन दिले जातात. ते दोघंही मेड फॉर इच अदर आहेत. दोघंही दोन गोंडस बाळांचे आई-बाबा आहेत. नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यास रितेश आणि जेनेलिया पसंती देतात.

रितेश देशमुख सध्या बॉलिवूड आणि मराठी सिनेमांच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो तर जिनीलिया त्यांच्या होम प्रोडक्शनच्या म्हणजेच निर्मिती आणि घरच्या जबाबदा-या सांभाळते. आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त पत्नी जिनीलियाने सोशल मिडीयावर एक खुपच खास मेसेज शेअर केला आहे. रितेशचा यंदा 40 वा वाढदिवस आहे आणि या निमित्त जिनिलियाचा मेसेज पाहून त्यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नसल्याचं पाहायला मिळंतय.

जिनिलियानं मेसेजमध्ये लिहलंय, "आजपासून 17 वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा मुझे तेरी कसमच्या सेटवर रितेशचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर मला रितेशचा वाढदिवस साजरा करण्याचे आजपर्यंत अनेक प्रसंग मिळाले. हा दिवस माझ्यासाठी खुप महत्त्वाचा आहे कारण याच दिवशी देवाने त्याची बेस्ट निर्मिती केली आणि मला गर्व आहे, की तो माझा जीवनसाथी आहे. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे व प्रत्येक प्रसंगातून मी तुझ्यावर ते व्यक्त करत राहीन."

https://www.instagram.com/p/BreMQH8hVit/

जवळपास दहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनीलीया या बॉलिवूडच्या मोस्ट लव्हेबल कपल 2012 साली लग्नबंधनात अडकले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive