By  
on  

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांंसीच्या दिग्दर्शकपदी कंगनाच: निर्मात्याची स्पष्टोक्ती

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती एका ऐतिहासिक सिनेमाची.  मणिकर्णिका हा सिनेमा शुटिंग सुरु झाल्या दिवसापासून या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन क्रिश यांनी केलं होतं. पण संपूर्ण सिनेमा शूट झाल्यानंतर निर्मात्यांनी आणखी काही सीन अ‍ॅड करण्याचं ठरवलं. त्यावेळी क्रिश दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झाल्याने या शुट्चं दिग्दर्शन कोण करणार असा पेच टीमसमोर होता. अशा वेळी कंगनाने पुढे होत दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली. या दरम्यान सोनू सुदनेही या सिनेमातून काढता पाय घेतला. अशा वेळी कंगनाने चिकाटीने शुटिंग पूर्ण केलं.

मणिकर्णिकाचा ट्रेलर उद्या रिलीज होत आहे. अशा वेळी दिग्दर्शनाचं क्रेडिट कुणाला द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला. पण सुत्रांच्या माहितीनुसार सिनेमाच्या निर्मात्यांनी मात्र कंगनाला क्रेडिट देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता ट्रेलर पाहताना दिग्दर्शकांच्या यादीत कंगनाचं नाव दिसलं तर आश्चर्य वाटायला नको.

Recommended

PeepingMoon Exclusive