By  
on  

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'चा ट्रेलर रिलीज, कंगनाला शोभतोय लढवय्या बाणा

झाशीच्या दैदिप्यमान स्वातंत्र्यलढ्याने प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली आहे. या लढ्याची शिल्पकार असलेल्या राणी लक्ष्मीच्या जीवनावरील सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरने पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाईच्या बाणेदारपणाची आठवण करून दिली आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत उठून दिसत आहे.

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या आपल्या पहिल्या वहिल्या बायोपिकसाठी कंगनाने घेतलेले कष्ट ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या सिनेमातील युद्धप्रसंग खरे वाटावेत यासाठी तिने तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखं कसब शिकून घ्यावं लागलं. या सिनेमासाठी कंगनाने ऑनस्क्रीन तर मेहनत घेतली आहेच याशिवाय ऑफस्क्रीनही कष्ट घेतले आहेत. कंगनाने सिनेमाच्या ७० टक्के भागचं दिग्दर्शन केलं आहे. तर ३० टक्के भागाचं दिग्दर्शन क्रिश यांनी केलं आहे.

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीच्या ट्रेलरमध्ये कंगनाने अनेक भूमिका लीलया पेलल्या आहेत. अवखळ मणिकर्णिका, शालीन लक्ष्मीबाई, प्रेमळ माता, कठोर शासक आणि शूर लढ्वय्या या सगळ्या भूमिकातून तिचा वावर अगदी सहज वाटतो.

कंगनासोबत या सिनेमामध्ये अतुल कुलकर्णी, डॅनी, सुरेश ओबेरॉय, जिशू सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत. याशिवाय अंकिता लोखंडे ही झलकारी बाईच्या भूमिकेत दिसून येते.

एकुणच काय कंगनाने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या ट्रेलरमध्ये जान ओतली आहे. आता सिनेमा रिलीज झाल्यावर तिच्या कामाचं कौतुक होईल यात शंका नाही. हा सिनेमा २६ जानेवारी २०१८ ला रिलीज होणार आहे.

https://youtu.be/tKmkMVaNu9g

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive