By  
on  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली या कलाकारांची भेट

भारतीय मनोरंजन विश्वाच्या कक्षा सर्वत्र रुंदावताना पाहायला मिळत आहे. साता समुद्रापार आपल्या भारतीय सिनेमाने झेंडा फडकावला आहे. मनोरंजन उद्योगाचा आणखी विस्तार व्हावा याकरिता मनोरंजन प्रतिनिधींच्या एका शिष्ट्य मंडळाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोदींकडे मनोरंजन उद्योगासाठी जीएसटीचा दर कमी करुन तो एक समान ठेवण्याची मागणी केली.

पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानच्या शिष्टमंडळात अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, निर्माता करण जोहर, राकेश रोशन, सेंसर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी आणि प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर यांचा समावेश होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/BriRrQNnvJI/

मुंबई ही मनोरंजन विश्वाची राजधानी म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने सकारात्म पाऊल उचलण्याचे आश्वासन मोदी यांनी या प्रतिनीधींना यावेळी दिले.

https://twitter.com/karanjohar/status/1075060793597677569

भारतीय मनोरंजन उद्योग हा संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या उद्योगामुळे विश्वात भारताची प्रतिष्ठा वाढण्यात सर्वाधिक मदत होत आहे. केंद्र सरकार नेहमीचं माध्यमं व मनोरंजन क्षेत्रासोबत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Recommended

PeepingMoon Exclusive