By  
on  

सलमान, शाहरुखचा कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनला येण्यास नकार

सध्या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ मध्ये कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चर्चा सर्वात जास्त असते. सध्याचा सीझन या शोचा सहावा सीझन असला तरी या शोची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आतापर्यंत या शोमध्ये नामांकित सिता-यांनी हजेरी लावलेली आहे. काही शो पाहुण्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे जास्त प्रसिद्धीस आले.

२००४ मध्ये या शो ची सुरुवात झाली. हा पहिलाच असा सीझन असेल ज्यामध्ये शाहरुख किंवा सलमान खान येणार नाहीत. तर आमीरने ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान रिलीज होण्यापूर्वी या शो मध्ये हजेरी लावली होती.

या सीझनमध्ये शाहरुख किंवा सलमानची अनुपस्थिती चाहत्यांना नाराज करणारी आहे. ‘कॉफी विथ करण’च्या फिनालेसाठी करण या जोडीला आमंत्रित करणार होता पण शाहरुख झिरोच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याने यावेळी ते शक्य होणार नाही.

या शो मध्ये बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खानदेखील येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आपापसातील मतभेद विसरून या दोघींनी करणच्या शोमध्ये हजेरी लावायचं कबूल केलं असल्याने या एपिसोड्विषयी प्रत्येकालाच उत्सुकता आहे.

विशेष म्हणजे या शो च्या पहिल्या तीनही सीजनमध्ये सलमान नव्हता. तर पहिल्या सीजनमध्ये शाहरुख एकदा काजोलसोबत तरा एकदा पत्नी गौरी खानसोबत दिसला होता.

करणच्या शोच्या चौथ्या सीजनमध्ये मात्र सलमान वडिल सलीम खान यांच्यासोबत दिसला होता. त्यानंतर पाचव्या सीझनला भाऊ सोहेल आणि अरबाज यांसोबत सलमानने स्क्रीन शेअर केली होती.

आता सलमान आणि शाहरुख ही करण-अर्जुनची जोडी शक्य झाल्यास सातव्या सीजनमध्ये असेल अशी आशा चाहत्यांनी करायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive