By  
on  

देशी ‘पॅडमॅन’चं नाव झळकलं ऑस्कर नामाकंनाच्या यादीत, शॉर्टसबजेक्ट श्रेणीमध्ये मिळालं नामांकन

भारताचं ऑस्करच्या शर्यतीमधील सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील सिनेमाचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी एका विभागात ते अजूनही टिकून आहे.

भारताची ‘पिरियड: एंड ऑफ सेन्टेंन्स’ ही डॉक्युमेंट्री ऑस्करच्या शॉर्ट सबजेक्ट कॅटॅगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे. ही डॉक्युमेंट्री ग्रामीण स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसात सामो-या जाव्या लागत असलेल्या कुप्रथांवर प्रकाश टाकणारी आहे.

याशिवाय ही डॉक्युमेंट्री देशी पॅडमॅन अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या कार्यावर देखील प्रकाश टाकते.

या डॉक्युमेंट्रीची निर्मिती गुनीत मोंगा आणि सिखिया एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे केली आहे. या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन इरानी-अमेरिकन फिल्ममेकर रायका जेहबाची यांनी केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचा कालावधी २६ मिनिटांइतका आहे.

उत्तर प्रदेशातील एका गावात सॅनिटरी पॅड व्हेँडिंग मशीन बसवल्यावर तेथील महिला आणि मुलींच्या आसपास ही कथा फिरत राहते. याशिवाय या डॉक्युमेंट्रीमध्ये अरुणाचलम मुरुगनाथम यांची स्वत पॅड निर्मितीची प्रक्रियाही दाखवण्यात आली आहे. २२ जानेवारी २०१९ मध्ये ऑस्करसाठीच्या अंतिम नामांकनासाठीची यादी प्रसिद्ध होईल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive