By  
on  

असा साजरा होणार ‘भाईजान’चा वाढदिवस, जोरदार तयारी सुरू

बॉलिवूडच्या भाईजानच्या वाढदिवसाची तयारी केवळ खान कुटंबियच नाही तर फॅन्सही मोठ्या प्रमाणावर करत असतात.
सलमानचा फॅन्स दरवर्षी २७ डिसेँबरची आतुरतेने वाट बघत असतात. आताही सलमानचा वाढदिवस जवळ आला आहे.
त्यामुळे त्याचा ५३ वाढदिवस झोकात साजरा करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.


सलमान त्याचा ५३ वा वाढदिवस कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांसोबत पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. हे सेलिब्रेशन त्याच्या वाढदिवसाच्या आदल्यादिवशी सुरु होईल आणि वाढदिवसाच्या दिवसापर्यंत चालेल.


सलमान सध्या ‘भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी भारतचं शुटिंग थांबवलं असून वाढदिवसानंतर ते पुन्हा सुरु होईल.
भारतमध्ये सलमानसोबत कतरिना काम करत आहे. यापूर्वी या सिनेमासाठी प्रियांकाची निवडा करण्यात आली होती. पण लग्नाचं कारण देऊन ऐनवेळी प्रियांकाने या सिनेमातून माघार घेतली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive