By  
on  

शाहरुख खानचा 'झिरो' यथातथाच; हे आहे बॉक्स ऑफीस कलेक्शन

शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या तिकडीचा जब तक है जाननंतर झिरो सिनेमा आला खरा. पण पडद्यावर या केमिस्ट्रीची जादू पुन्हा चालू शकलेली दिसत नाही. याला कारणही तसंच आहे. झिरोचं कथानक तितकं भावणारं म्हणण्यापेक्षा रुचणारं नाही. पण हा बॉलिवूडच्या किंग खानने मात्र हा सिनेमा तारलाय. म्हणजेच हा सिनेमा पूर्णपणे शाहरुख फॅन्ससाठीच आहे.

शाहरूखच्या झिरोने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास २०.१४ कोटी रूपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नाही, मात्र विकेंडला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत.

शाहरूख खानचा ‘झिरो’ हा सिनेमा भारतात ४,४०० आणि विदेशात १५०० स्क्रीनवर झळकला आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये आहे.

 

https://twitter.com/taran_adarsh/status/1076338523274268673

Author

Recommended

PeepingMoon Exclusive