By  
on  

बिग बजेट ‘महाभारत’मध्ये आमीर साकारणार ‘ही’ भूमिका

सगळ्यांनाच माहीत आहे की आमीर सिनेमा निवडीच्या बाबतीत अत्यंत चुझी आहे. त्याला रुचतील अशाच भूमिका निवडतो. असं असलं तरी आमीरला यावर्षी मात्र अपयशाचं तोंड पहावं लागलं. आमीरच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ची जादू काही प्रेक्षकांवर चालली नाही. परिणामी सिनेमा फ्लॉप झाल. या अपयशाची जबाबदारी स्विकारत आमीरने पुढे जाण्याचं ठरवलं आहे.

आमीर सध्या ‘महाभारत’ या बिग बजेट सिनेमामध्ये गुंतला आहे. या सिनेमात आमीर कृष्णाची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विशेश म्हणजे शाहरुखही या सिनेमात कृष्णाच्या भूमिकेसाठी उत्सुक होता. पण ही भूमिका आमीरला मिळाली असल्याने त्याला कृष्ण साकारायची संधी मिळणार नसल्याचं त्याने अलीकडेच स्पष्ट केलं.

‘महाभारत’ हा मेगासिरीज सिनेमा असणार आहे. हा सात भागात प्रदर्शित होणार असून त्याचं बजेट जवळपास १०० कोटी रुपयांचं असणार आहे. या सिनेमातील द्रौपदीची भूमिका करण्यासाठी दिपिका पदुकोणला विचारण्यात आलं होतं. पण तिने ही व्यक्तिरेखा साकारण्यास नकार दिला.

Recommended

PeepingMoon Exclusive