By  
on  

जान्हवी कपूर बनली फायटर प्लेन पायलट, लूक झाला व्हायरल

भारतीय लष्कराविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष जागा आहे. म्हणून तर बॉलिवूडलाही भारतील लष्करावर सिनेमे बनवायचा मोह आवरत नाही. याशिवाय भारतासाठी जीव पणाला लावणा-या जिगरबाज लढवय्यांवर देखील अनेक सिनेमे बनले आहेत. यामध्ये महिलांचं योगदानही अतुल्य आहे. अशाच विषयावर आणखी एक सिनेमा येतोय.
निर्माता, दिग्दर्शक करण जोहर फ्लाईट लेफ्ट्नंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवत आहे. गुंजन यांनी १८ वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं.

https://www.instagram.com/p/Br1_9vNgnIR/?utm_source=ig_web_copy_link

गुंजन यांच्या आयुष्यावरील सिनेमात जान्हवी कपूर काम करत आहे. त्या पार्श्वभूमीवर एअरफोर्स अधिका-याचा गणवेश घातलेल्या जान्हवीचा लूक नुकताच व्हायरल झाला आहे.
करीअरमधील पहिल्या वहिल्या बायोपिकसाठी जान्हवीने आतापासूनच मेहनत सुरु केली आहे. तिने गुंजन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला आहे. तसेच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही अनुभवही जाणून घेतले आहेत. आता पडद्यावर जान्हवीकडून गुंजन यांची व्यक्तिरेखा कशी साकारली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive