By  
on  

भाईजान सलमान खानचा 53 वा वाढदिवस; या सिनेमांनी बनला चाहत्यांचा लाडका 'प्रेम'

आज बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचा 53 वा वाढदिवस आहे. सालाबादप्रमाणेच तो आपला यंदाचा वाढदिवसही  मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करतोय. इंडस्ट्रीत न्यू कमर्सचा गॉडफादर म्हणून मिरवणा-या या दबंग खानची इंडस्ट्रीत जवळपास 30 वर्षांची कारकिर्द आहे.

 

 

सलमान खानचा जन्म मुंबईतच झाला. त्याचे वडील सलीम खान हे बॉलिवुडच्या प्रसिध्द लेखकांपैकी एक. सलमानलासुध्दा वडिलांसारखंच लेखक व्हायचं होतं पण त्याला अभिनयाची संधी मिळाली आणि मग काय त्याने सिनेरसिकांवर जादूच केली.

Recommended

PeepingMoon Exclusive