By  
on  

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चा ट्रेलर झाला रिलीज, लव्हस्टोरीत दडलंय एक रहस्य

सोनम कपूर आणि अनिल कपूर या रिअल लाईफ बापलेकीच्या जोडीची प्रमुख भूमिका असलेला 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. राजकुमार राव व जुही चावला यांच्यसुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचा हद्यस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

पारंपारिक पंजाबी घराण्यातील एक गर्ल नेक्स डोअर अशी इमेज असलेल्या मुलीच्या म्हणजेच सोनम कपूर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात एक नाटककार मुस्लीम तरुण  म्हणजे अभिनेता राजकुमार राव पडतो. नेहमीप्रमाणेच बॉलिवुड सिनेमांमधल्या नाट्याप्रमाणे या प्रेमाला त्यांच्या घरच्यांचा आणि सोनमच्या वडीलांचा म्हणजे अनिल कपूर यांच्या व्यक्तिरेखेचा तीव्र विरोध असतो. लग्नासाठी सतत विविध स्थळं घेऊन सोनमच्या मागे घरच्यांचा लग्नासाठी तगादा सुरु असतो. सोनमचं लग्न होतं का, तिला तिचं प्रेम मिळतं का.पण कहानी मै ट्वीस्ट कुछ और ही है, पण ते नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 

 

शैली चोप्रा दिग्दर्शित या सिनेमाच्या निर्मितीची धुरा विधु विनोद चोप्रा यांनी सांभाळली असून हा सिनेमा 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शैली चोप्रा ही विधु विनोद चोप्रा यांची बहिण आहे. अनिल कपूर आणि सोनम कपूर हे दोघंही यानिमित्ताने प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करतायत. अनिल कपूर-मनीषा कोइराला यांचा ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सुपरहिट सिनेमाच्या ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या पॉप्युलर गाण्यावरुन या सिनेमाचं टायटल ठेवण्यात आलं आहे, पण हेच खुप काही सांगून जातं.

 

https://youtu.be/pKcamCgBvMo

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive