By  
on  

सिंबामध्ये अक्षय कुमारचा कॅमिओ, रोहित शेट्टीच्या आगामी पोलिसपटातही साकारणार भूमिका

रोहीत शेट्टीच्या सिनेमांमध्ये मसाला आणि अ‍ॅक्शची रेलचेल असते. त्याला काही प्रमाणात विनोदाचं अंगही असतं. रोहीतच्या आतापर्यंतच्या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत राहिला आहे.
पण सिंबामध्ये मात्र त्याने रणवीरला मुख्य भूमिका दिली. सिंबाचं शुटिंग संपता संपताच त्याने आणखी एका पोलिसपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या नव्या पोलिसपटात मात्र यावेळी अभिनेता अजय नसणार आहे.


पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार रोहितच्या आगामी पोलिसपटात अक्षय कुमार असणार आहे. सिंबानंतर लगेचच रोहित मल्याळम सिनेमा अ‍ॅक्शन हिरो बिजूच्या रिमेक असलेल्या सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात करणार आहे.
रोहितला पोलिसपटांमध्ये विशेष रस असल्याने ही फ्रॅंचाईझी आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा त्याचा विचार आहे.
२०१९च्या मे किंवा जूनमध्ये या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल. या सिनेमाच्या शुटिंगसाठी सलग तारखा देता याव्यात म्हणून अक्षयने ‘हेराफेरी ३’च्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.
या सिनेमाचं संपूर्ण शुटिंग उत्तर भारतातील लोकेशन्सवर केलं जाणार आहे. त्यासाठी सिनेमाची संपूर्ण टीम दोन महिने उत्तर भारतात वास्तव्य करेल.
या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टीचा सिंबा उद्या म्हणजेच २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात सिंघम अजय देवगणचा कॅमिओ असल्याचं सर्वांना माहित आहेच. पण विशेष म्हणजे अक्षयचाही यात एक कॅमिओ आहे. त्यामुळे सहाजिकच अक्षयच्या चाहत्यांना आनंद होईल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive