By  
on  

बॉलिवूडची वर्षअखेर सिंंबामुळे गोड, रोहित शेट्टीच्या खात्यात आणखी एक ब्लॉकब्लस्टर

या वर्षाअखेरीस रोहित शेट्टीने ‘सिंबा’सारखा हिट सिनेमा देऊन बॉलिवूडला सलणारा अपयशाचा सल दूर केला आहे. या वर्षी बहुचर्चित असलेले ठग्ज ऑफ हिंदोस्तान आणि झिरो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटल्यानंतर बॉलिवूडला एका सुपरहिटची गरज होती ती गरज सिंबा पूर्ण करत आहे असं सिनेमा बघताना पदोपदी जाणवत राहतं.
२०१८ चा शेवटा सुपरहिट सिनेमाने झाल्याने बॉक्स ऑफिसवर आनंदाचं वातावरण आहे. या यशाचे पडसाद नव्या वर्षीही पडत राहतील अशी आशाही यानिमित्ताने केली जात आहे.
सिंबामधील संग्राम भालेराव (रणवीर सिंग)ने या सिनेमात स्वत:ची अशी स्टाईल वापरली आहे. तो दबंगमधल्या सलमानसारखा कूल पण लाच घेणारा अधिकारी आहेच पण त्याच्यात राउडी राठोडमधल्या अक्षयसारखा डॅशिंग अ‍ॅटिट्युडदेखील आहे. पद्मावतसारख्या ऐतिहासिक सिनेमात काम करून त्याने त्याने अभिनयाची उंची दाखवून दिलीच पण सिंबामधील व्यक्तीरेखेने त्याच्या अभिनयाचा नवा पैलू समोर आला आहे.


सिनेमाच्या मध्यंतरापर्यंत रणवीर इमोशन, ड्रामा, डायलॉग डिलीव्हरी यांनी मन जिंकतो. पण इंटर्व्हलनंतर सिंबा ख-या अर्थाने हिरो वाटू लागतो. कारण सिनेमात इमोशन, ड्रामा, डायलॉग डिलीव्हरी यासोबतच रणवीरची अ‍ॅक्शनही पहायला मिळते.
सिंबाच्या यशामागे केवळचा रणवीरचा हात नाही तर साराचंही तितकंच योगदान आहे. सारा यात शगुन नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. साराने यापूर्वी ‘केदारनाथ’ मध्ये अभिनयाचा जलवा दाखवला होता. सिंबामध्ये तिच्यातील अभिनय क्षमता आणखी सुधारली आहे यात शंका नाही. साराचं गोड हास्य आणि बबली स्वभाव यामुळे शगुनच्या व्यक्तिरेखेत ती सहज सामावली आहे. रणवीर आणि साराची केमेस्ट्री चांगली जमली असली तरी टिपिकल रोमान्सऐवजी त्यांच्या नात्यामधील खेळकरपणाच अधिक जाणवतो.
सिंबाचं यश हे रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाचंही आहे. कारण सिनेमाच्या कथेत नावीन्य नसलं तरी तिला न्याय देण्याचं कसब रोहितला जमलं आहे. गोलमालच्या यशस्वी फ्रॅंचाईजीनंतर सिंघमच्या ऑल टाईम हिट स्टोरीच्या वरचढ सिनेमा आणणं ही रोहित शेट्टी आणि त्याच्या टीमवर सर्वात मोठी जबाबदारी होती. सिंबाचं यश ही जबाबदारी योग्यरित्या पार पडल्याचं द्योतक आहे.

https://youtu.be/PtFY3WHztZc

Recommended

PeepingMoon Exclusive