By  
on  

अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी अमेरिकेला रवाना

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. काही दिवसांपासून पाठीच्या दुखण्याने त्यांना हैराण केल्यामुळे ते उपचार घेण्यासाठी अमेरिकेला गेले असल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान स्टंट करताना त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती.

याच पाठीच्या दुखण्याने मिथुन यांना अस्वस्थ केल्यामुळे त्यांना लॉस एंजलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या मुलगा महाअक्षय चक्रवर्ती आणि सून मदालासा शर्माही अमेरिकेत आहेत.२००९ साली लकी सिनेमाच्या सेटवर स्टंट करताना मिथुन दा यांना ही दुखापत झाली होती. त्यानंतर बरेच वर्ष त्यांचं पाठीचं हे दुखणं सुरुच होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते या त्रासाने त्रस्त आहेत.

मिथुनदा यांनी बॉालिवुड फक्त अभिनय कौशल्यानेच नाही तर आपल्या जबरदस्त नृत्याने गाजवले. 1982 मध्ये आलेला  त्यांचा डिस्को डान्सर हा सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला. त्यांनी झी टीव्हीवरील 'डान्स इंडिया डान्स' या सुपरहिट डान्स रिएलिटी शोची अनेक पर्व परिक्षकपदी विराजमान होऊन गाजवली. अजुनही ते आपल्या अभिनय कारकिर्दीत तितकेच सक्रीय असतातत.

Recommended

PeepingMoon Exclusive