दीपिका कक्कर ठरली 'बिग बॉस 12'ची विजेती

By  
on  

यंदाच्या बिग बॉस सुपरहिट रिएलिटी शोच्या सीझनवर प्रचंड टीका झाली. अनेक कारणांनी या शोच्या या सीझनबद्दल उलट-सुलट चर्चा रंगली होती. पण 'बिग बॉस 12' हा किताब कोण पटकावणार याबाबतसुध्दा बरीच उत्सुकता होती. अखेर छोट्या पडद्यावरील ससुराल सिमर का मालिका फेम सुनबाई अभिनेत्री दीपिका कक्कर 'बिग बॉस 12' ची विजेती ठरली.

करणवीर बोहरा, दीपक ठाकूर, श्रीशांत या तिघांच्या नावावरच विजेतेपदासाठी चर्चा असातानाच दीपिकाने या तिघांना मात देत 'बिग बॉस 12'च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. दीपिका आणि श्रीशांत या दोन स्पर्धकांमध्ये हा शो जिंकण्यासाठी अंतिम फेरी रंगली. पण दीपिकाने या चुरशीच्या लढतीत श्रीशांतला मागे टाकले.

105 दिवस सलग या शोमध्ये अनेक प्रसंगांमधून आणि विविध टास्क खेळत दीपिकाने बिग बॉसच्या घरातील आपलं स्थान अबाधित ठेवलं. सर्वांनाच या शोच्या विजेत्याची उत्सुकता होती. रविवारी 30 डिसेंबरला बिग बॉस 12ची ही महाअंतिम सोहळा रंगला.

दीपिकाच्या पतीला आपल्या पत्नीच्या विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तिला तर चक्क उचलूनच घेतले.

Recommended

Loading...
Share