हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें' सारख्या गरजणाऱ्या वाघाच्या धैर्य, बुद्धीचातुर्य, रोखठोक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, आक्रमकता, त्याग, संघर्ष आणि अतुलनीय सत्याची खरी कथा दर्शविणारा 'ठाकरे' हा ख्यातनाम राजकारणी आणि शिवसेना संस्थापकांच्या जीवनावर आधारीत चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
'ठाकरे' या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपटाची झलक पाहता, या चित्रपटाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ट्रेलरवरून हे दिसून येते की नवाजुद्दीन सिद्दीकी यांने साकारलेले शिवसेनाप्रमुखांचे चित्रण कसे नखशिकांत परिपूर्ण आहे. नवाजुद्दीनने बाळासाहेब इतके हुबेहूब साकारले आहेत की, चित्रपटात अभिनेता शोधणे कठीण आणि बाळासाहेबांना शोधणे सोपे जाणार आहे.
'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाची टीम ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले असून येत्या २५ जानेवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.
https://twitter.com/ThackerayFilm/status/1079422133342752769