By  
on  

जीवघेण्या आजारपणाशी हसत लढा देणारी ‘जिंदादिल सोनाली बेंद्रे’

लोभस व्यक्तिमत्व लाभलेल्या सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरने गाठल्याचं कळताच अनेकांना धक्का बसला. सोनालीने मात्र या कठिण प्रसंगातही स्वत:मधील सकारात्मक उर्जेला कायम ठेवले. याचाच परिपाक म्हणून या आजारावरील उपचाराचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार करून ती अलीकडेच भारतात परतली.

आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस आहे. आजारपणानंतर हा तिचा पहिलाच वाढदिवस आहे. सहाजिकच हा दिवस तिच्यासाठी खास असेल यात शंका नाही. सोनाली न्यूयॉर्क येथे उपचार घेत होती. तिचे पती गोल्डी बहलसुध्दा तिच्यासोबत होते.

https://twitter.com/iamsonalibendre/status/1079657486519435264

या आजारपणातील अनेक अवघड टप्प्यांना सोनाली धीराने सामोरी गेली आहे. स्त्रियांचं सौंदर्यप्रतिक समजले जाणारे केस ट्रीट्मेंटमध्ये गेल्यानंतरही हा बदल सोनालीने धीराने स्विकारला होता.

सोनालीने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सॅलॉनमधील एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीचा ब्लो ड्रायिंग करताना फोटो पोस्ट केला आहे. ती म्हणते, ‘ही मागीलवर्षी केस कापण्यापूर्वीची आठवण आहे. माझे केस आता हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे येत्या २०१९मध्ये मला पुन्हा ब्लो ड्रायिंग करता येईल अशी आशा आहे. या प्रवासाने मला खुप काही शिकवलं.

सोनालीची ही जिंदादिली तिला पुढे जाण्यासाठी बळ देईल अशी आशा करुया. पीपिंगमूनतर्फे सोनालीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

 

Recommended

PeepingMoon Exclusive