By  
on  

‘उरी’च्या निर्मात्यांनी केला हटके स्टाईलने प्रोमो रिलीज, सांगितला सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ

उरी’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्टाईकवर आधारित असलेल्या या सिनेमात विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
18 सप्टेंबर 2016मध्ये भारतीय सैन्याच्या उरी येथील तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. ही चकमक जवळपास सहा तास चालली होती. यात आपले 17 जवान शहीद झाले होते. तर सहा तासानंतर जवळपास सगळे अतिरेकी यमसदनाला धाडण्यात भारतीय सैन्याला यश मिळालं.
या व्हिडिओमध्ये यामी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना दिसत आहे. त्यात ती सर्जिकल स्टाईक हल्ल्याबाबत सांगत आहे. याच दरम्यान विकिची त्या ठिकाणी होणारी एंट्री अत्यंत अनोख्या पद्धतीने दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘छल्ला’ हे गाणं रिलीज झालं होतं. उरी सिनेमासाठी प्रत्येक कलाकाराने मेहनत घेतलेली दिसून येत आहे. विकी उरीमधील कमांडर इन चीफची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याला कठोर मेहनत घ्यावी लागली. रोज सलग 5 तास ट्रेनिंग सोबतच स्ट्रिकट डाएट ही फॉलो करावं लागलं. त्यामुळे हा सिनेमा विकिसाठी खास असल्याचं तो आवर्जून सांगतो.

11 जानेवारी 2019 रोजी ‘उरी’ हा सिनेमा प्रदर्शित होईल. RSVP मुव्हिजने या सिनेमाची निर्मिती केली असून दिग्दर्शन अनिल धर यांनी केलं आहे.

https://twitter.com/RSVPMovies/status/1080773631917969409

Recommended

PeepingMoon Exclusive