By  
on  

ठरलं तर! विवेक ओबेरॉय साकारणार पंतप्रधान मोदी, या दिवशी येणार फर्स्ट लुक

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर  द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा  येतोय, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. महत्तवाचं म्हणजे नरेंद्र मोदींचा जीवनप्रवास रेखाटणा-या या सिनेमात अभिनेता विवेक ऑबेरॉय मोदी साकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधी माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार आणि निर्मिती संदीप सिंग करणार आहे. येत्या ७ जानेवारी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/1081044861355155459

 

हा सिनेमा प्रदर्शित कधी होणार आणि याचं नाव काय असेल याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे, पण लवकरच त्यावरुन पडदा उठेल.

Recommended

PeepingMoon Exclusive