By  
on  

२०१९ ची सुरुवात ठरली ‘बायोपिकमय’ पाहा कोणकोणते सिनेमे आहेत या यादीत

सिनेविश्वात सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या महिन्यात सिनेरसिकांना एकपेक्षा एक सरस अशा बायोपिक्सची मेजवानी मिळणार आहे. या महिन्यात चार सर्वात महत्त्वाचे असे बायोपिक रिलीज होत आहेत. जाणून घेऊ त्यांच्याविषयी.

भाई : व्यक्ती कि वल्ली

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले पु.ल. देशपांडे यांचा जीवनपट भाई : व्यक्ती कि वल्ली या सिनेमातून दाखवला जाणार आहे. हा सिनेमा ४ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई : व्यक्ती कि वल्ली’ हा सिनेमा दोन भागात प्रदर्शित केला जाणार आहे. असा प्रयोग केलेला तो मराठीतील पहिलाच सिनेमा असेल. सागर देशमुख यात भाईंची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=FbcKVZ1IPDw

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'

मनमोहन सिंग यांचे मिडिया सल्लागार असलेले संजया बारु यांच्या ‘द : अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच होती. पण ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादात सापडला आहे. सगळं काही सुरळीत झालं तर हा सिनेमा ११ जानेवारीला प्रदर्शित होईल.

https://www.youtube.com/watch?v=q6a7YHDK-ik&t=3s

ठाकरे

‘ठाकरे’ हा ख्यातनाम राजकारणी आणि शिवसेना संस्थापकांच्या जीवनावर आधारीत चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. खासदार संजय राऊत या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=INOTrg-wQgE&t=54s

मणिकर्णिका: क़्वीन ऑफ झांसी

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. मर्दानी राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट या बायोपिकमधून उलगडणार आहे. मणिकर्णिकासाठी कंगनाने खुपच जबरदस्त असे अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट लिलया करताना पाहायला मिळणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=eBw8SPPvGXQ

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive