By  
on  

बिग बॉस विजेती दीपिका कक्करला मिळाली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

बिग बॉस 12 चा किताब पटकावणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या यशोशिखरावर आहे. सध्या तिला आणितिच्या कुटुंबियांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रिएलिटी शोच्या या विजयामुळे सध्या दीपिकावर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण तिच्या आनंदाला नुकतंच एक गालबोट लागलं आहे. या कार्यक्रमात दीपिकाचा प्रतिस्पर्धी असलेला माजी क्रिकेटर श्रीशांतच्या एका चाहत्याने तिला ट्विटरवरुन धमकावले आहे.

या श्रीशांतच्या चाहत्याने ट्विटरवर लिहलं आहे, जर तो कधी मुंबईला आला तर तो दीपिकावर अ‍ॅसिड हल्ला करेल. या ट्विटनंतर लगेचच दीपिकाच्या फॅन ट्विट हॅंण्डलने या धोक्याची सूचना मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन दिली आहे.

https://twitter.com/DipikaKakar_TM/status/1081265396798377984

 

या दरम्यान या शोमधील दीपिका कट्टर प्रतिस्पर्धी सुरभी राणा तिच्या समर्थनासाठी आली आहे. एका वेबसाईटशी बोलताना सुरभी म्हणाली, "आपल्याला प्रेक्षकांच्या मतांचा आदर करायला हवा. प्रत्येकाची निवड वेगवेगळी असते हे जरी मान्य असलं तरी अखेरचा कौल हा प्रेक्षकांचाच ठरतो. हा एक खेळ आहे व यात एकच विजेता ठरतो आणि वस्तुस्थिती आपण स्विकारली पाहिजे."

'बिग बॉस 12' सिजनमध्ये टीव्ही टेलिव्हिजन अभिनेत्री र दीपिका कक्कर आणि माजी क्रिकेटपटू श्रीसंत यांच्यात अंतिम फेरीची मोठी चुरस रंगली. अखेर दीपिका कक्कर या शोची विजेती ठरली. दीपिकाने ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं असलं तरी अनेकांना तिचा हा विजय रुचला नसल्याचं दिसून येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive