By  
on  

सोनाक्षी सिन्हा करतेय या डेब्यूटन्टला डेट, सलमान खान आहे त्याचा गॉडफादर

बॉलिवूडमध्ये कधी कोण कोणासोबत फिरेल, कोणाचं अफेअर कोणासोबत असेल याचा काहीच नेम नसतो. सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्याप्रत्येक बारीक-सारीक हालचालींवर प्रसिध्दी माध्यामांची करडी नजर असते.असंच काहीसं सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत झाल्याचं दिसून येतंय.

2018 हे वर्ष बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नसोहळ्यांनी प्रचंड गाजलं. यादरम्यान सोनाक्षी सिन्हासुध्दा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. पण सध्या येत असलेल्या बातम्यांनुसार सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल या तरुणाला डेट करतेय. हा झहीर इक्बाल कोण, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकचं आहे. झहीर हा लवकरच बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या ‘नोटबुक’ या सिनेमाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण करतोय. त्याच्या पदार्पणाची सर्व जबाबदारी सलमानवरच आहे. झहीरचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमाने खास मित्र आहेत. सलमानच्या ‘नोटबुक’मध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन हिच्यासोबत तो पदार्पण करत आहे.

https://www.instagram.com/p/BjhPWuklvtj/?utm_source=ig_embed

विशेष म्हणजे सलमानच्या नुकत्याच पार पडलेल्या पनवेल फार्म हाऊसवरील शानदार बर्थ डे पार्टीत अनेक सेलिब्रिटी हजर होते. यावेळी सोनाक्षी आणि झहीर एकाच कारमधून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. झहीरनेसुध्दा सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जूनमध्ये एक गोड फोटो आणि एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1002054645425102848

तसंच काही दिवसांपूर्वी सोनाक्षीच्या एका पोस्टवर वरुण धवनने तिला भाभी म्हणूनसुद्धा संबोधलं होतं. त्यावरुनसुध्दा सोनाक्षीकडे यंदा कर्तव्य आहे, अशा बातम्यांनी जोर धरला.

Recommended

PeepingMoon Exclusive