By  
on  

‘व्यक्तिरेखेसाठी काहीही’ असं म्हणतोय आयुष्मान खुराणा: आगामी सिनेमात दिसणार हटके लूकमध्ये

आयुष्मान खुराणाच्या नावासोबत अनेक वेगळ्या व्यक्तिरेखांची नावं जोडली गेली आहेत. आयुष्मानने आतापर्यंत साकरलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. २०१८मध्ये त्याच्या ‘बधाई हो’ आणि अंधाधुंद या सिनेमांनी चांगलं यश मिळवलं. आयुष्मान सध्या ‘बाला’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

आयुष्मान खुराणाच्या नावासोबत अनेक वेगळ्या व्यक्तिरेखांची नावं जोडली गेली आहेत. आयुष्मानने आतापर्यंत साकरलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. २०१८मध्ये त्याच्या ‘बधाई हो’ आणि अंधाधुंद या सिनेमांनी चांगलं यश मिळवलं. आयुष्मान सध्या ‘बाला’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अमर कौशिक या सिनेमाचे दिग्ददर्शक आहेत. या सिनेमात आयुष्मान एका टक्कल असलेल्या व्यक्तीच्या रोलमध्ये आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुष्मान या व्यक्तिरेखेसाठी टक्कल करणार आहे.

 

यावर आयुष्मान म्हणतो, एखाद्या व्यक्तिरेखेची मागणी अशा प्रकारे असू शकते आणि एक अभिनेता म्हणून मला ती पूर्ण करयलाच हवी.’ विशेष म्हणजे या सिनेमात त्याच्यासोबत भूमी पेडणेकरही आहे. आयुष्मान आणि भूमीचा हा तिसरा एकत्रित सिनेमा आहे. याआधी दोघांनींही ‘जोर लगा के हैशा’ आणि ‘शुभमंगल सावधान’ या सिनेमात एकत्रित काम केलं आहे.

आता या नव्या व्यक्तिरेखेसाठी आयुष्मान अजून काय काय बदल करतो ते वेळ आल्यावर कळेलच.

 

Recommended

PeepingMoon Exclusive