By  
on  

सिनेमा हिट होताच सारा अलीखान बनली या ब्रॅण्डचा चेहरा, साईन केली पहिली जाहिरात

सारा अलीखानचे तारे सध्या जोरात आहेत असं दिसून येत आहेत. कारण ‘केदारनाथ’ या तिच्या सिनेमाला यश मिळालं नसलं तरी साराच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं.


त्यानंतर तिचा दुसरा सिनेमा सिंबा मात्र ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे. सिंबाच्या रुपाने साराला बॉलिवूडमधील पहिलं वहिलं यश मिळालं. असं असलं तरी सिंबाच्या सक्सेस पार्टीत मात्र सारा कुठेच दिसून आली नाही.
सारा सध्या प्रकाशझोतात आली आहे ते एका नव्या असाईनमेंटमुळे. साराच्या यशाचा फायदा करून न घेतील ते ब्रॅण्ड्स कसले! म्हणूनच ‘व्हीट’ या हेअर रिमुव्हर क्रीमच्या ब्रॅण्डने या प्रोड्क्ट्चा चेहरा म्हणून साराची निवड केली आहे.


यापूर्वी श्रद्धा कपूर या ब्रॅण्डच्या जाहिरातीत दिसून येत होती. पण तिची जागा आता ‘यंग सेन्सेशन’ सारा अलीखानने घेतली आहे. सारा मार्चपासून व्हीटच्या जाहिरातींमध्ये दिसून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive