By  
on  

बॉलिवूडला पुन्हा एका लग्नाचे वेध, ही जोडी यंदा अडकणार का लग्नबंधनात?

बॉलिवूडमध्ये सध्या लग्न आणि रोमान्सचा सीझन सुरु आहे असं म्हटलं तरी चुकिचं ठरणार नाही. कारण आधीच प्रेमात असलेल्या जोड्या लग्नाच्या बंधनात अडकत आहेत तर काही नवीन जोड्या समोर येत आहेत. बॉलिवूडलाही अशाच एका जोडीच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ही जोडी आहे शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर.

दीपिका-रणवीरच्या बहुचर्चित रिसेप्शन पार्टीत फरहान आणि शिबानी हे एकत्रच उपस्थित होते. तेव्हा तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरुनच त्यांच्या नात्याबाबत सर्वांना चांगलीच कल्पना आली होती. तसंच ते आत्ता खुल्लम खुल्ला एकत्र हिंडतात. म्हणून लवकरच ते आपल्या नात्याला अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यासाठी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतील अशी चर्चा आहे.

विशेष म्हणजे फरहानच्या मुलांचं आणि शिबानीचं ट्युनिंगही चांगलं जुळलं आहे. त्यामुळे एकंदरीतच फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाला हिरवा कंदील मिळाल्याचं बोललं जात आहे.

https://www.instagram.com/p/BrmWB3KBj_J/?utm_source=ig_embed

फरहानने पत्नी अधुनासोबत २०१७मध्ये घटस्फोट घेतला. अधुनाही दुस-या नात्यामध्ये गुंतली आहे. मध्यंतरी तिने एका पोस्टद्वारे हे स्पष्ट केलं होतं. आता फरहानलाही पार्ट्नर भेटल्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive