By  
on  

‘मीटू’मध्ये राजकुमार हिरानींचंही नाव? पाहा कोणी केलाय आरोप

बॉलिवूडमधील ‘मीटू’चं वादळ शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. बॉलिवूडमध्ये नाना-तनुश्री, आलोकनाथ-विनिता ही प्रकरणं अजूनही धगधगत असताना आणखी दिग्दर्शकाला मीटू वरील आरोपाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह दिसत आहेत.

राजकुमार हिरानी यांच्यावर एका असिस्टंट डायरेक्टरने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ‘संजू’ सिनेमाच्या पोस्ट प्रॉड्क्शनवेळी हा प्रकार घडल्याचं महिलेने सांगितलं. यावेळी केलेल्या आरोपांमध्ये असंही म्हटलं आहे की हा प्रकार जवळपास ६ महिने सुरु होता. मार्च ते सप्टेंबर २०१८ या कालावधी ‘संजू’ सिनेमाच्या पोस्ट प्रॉड्क्शनवेळी लैंगिक अत्याचार केला गेल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

या सगळ्या प्रकाराच्या आरोपाचं राजकुमार हिरानींच्या वकिलांनी खंडन केलं आहे. ते म्हणतात, ‘हा प्रकार सगळा काल्पनिक आहे. यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही.’ संबंधित महिलेने मेल द्वारे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. राजकुमार हिरानींवरील आरोपात खरोखरच तथ्य असल्यास बॉलिवूडसाठी मोठा धक्का असेल यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive