By  
on  

ऑस्ट्रेलियामध्ये रोमॅंटिक क्षण एन्जॉय करतायत विराट-अनुष्का

नेहमीच सर्वात चरचिला जाणा-या सेलिब्रिटी कपल पैकी एक आवडतं सेलिब्रिटी कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. दोघांनाही आपल्या कामाच्या व्यापामुळे एकमेकांना द्यायला वेळच मिळत नाही. विराट नेहमी आपल्या क्रिकेट दौ-यावर असतो तर अनुष्का सिनेमांच्या शुटींगमध्ये बिझी असते.

मग विराटच्या मॅचेसदरम्यानचा वेळ वाया न घालवता हे दोघं एकमेकांसोबत व्यतित करण्याचं ठरवतात. मॅचेस सुरु असताना विराटचा उत्साह वाडवण्यासाटी अनुष्का नेहमी हजर असते.नंतरचा वेळ ते दोघे एकमेकांसाठी देतात. या फोटोतूनच त्यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळतो.

https://www.instagram.com/p/BskxcuwnLxB/?utm_source=ig_embed

 

एकमेकांसोबत दोघं खुपच छान दिसतायत, यावेळी त्यांच्या फोटोंवरुन त्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटल्याचे दिसून येतेय.

 

https://www.instagram.com/p/BsUn2XmACtw/?utm_source=ig_embed

 

विराटमुळेच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावर टेस्ट सिरीजमध्ये विजय मिळवता आला होता. तसंच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला आपल्या निवासस्थानी निमंत्रित केलं होतं.यावेळी विराटने मोठ्या उत्साहात पत्नी अनुष्काची त्यांच्यासोबत ओळख करुन दिली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive