By  
on  

फरहान अख्तर -शिबानी दांडेकरचा स्विमिंग पूलमधला हा रोमान्स पाहा

फरहान अख्तर आणि ही पोली साजूक तुपातली फेम शिबानी दांडेकर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी आहे. आजकाल ते नेहमीच एकमेकांसोबतच्या फोटोंमुळे आणि सार्वजनिकरित्या एकत्र स्पॉट होण्यामुळे बॉलिवूडमधील हॉट टॉपिक बनले आहेत. तसंच काही दिवसांपूर्वीच या लव्हबर्ड्सचा साखरपुडासुध्दा पार पडल्याच्या चर्चा रंगल्या.

खुद्द शिबानीनेच सोशल मीडियावर स्विमिंगपुलमध्ये फरहानसोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. यांत फारहान आणि  शिबानी रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

तुझं माझ्यासोबत असणं ही भावनाच माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे शेवटपर्यंत मी असाच तुझ्यासोबत असेन. तुला कधीही माझ्यापासून दूर होऊ देणार नाही, जबरदस्त कॅप्शन फरहानने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे, यावरुनच हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात किती आकंठ बुडाले आहेत ते समजते.

https://www.instagram.com/p/Bskx-0Xh1NY/?utm_source=ig_embed

शिबानी नुकतीच नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त फरहानची मुलं आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना या फोटोत पाहायला मिळत आहेत. शिबानीसोबत फरहानच्या मुलाचं ट्युनिंग छान जुळत असल्याने लवकरच ते पुढचं पाऊल उचलणार असल्याचे समजते.

https://www.instagram.com/p/BsZ4HStAfuy/

फरहान अख्तरने 2017 साली पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive