By  
on  

प्रिया प्रकाश वॉरियरच्या ‘श्रीदेवी बंगलो’ चा टीझर पाहून बोनी कपूरचा संताप

तिच्या नजरेच्या अदांनी अवघ्या देशभरातील आबाल-थोरांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर आगामी ‘श्रीदेवी बंगलो’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो पाहून बोनी कपूर चांगलेच संतापले आहेत आणि फक्त यावरच ते थांबले नसून यासंदर्भा त्यांनी पुढचं पाऊल उचलंलय ते म्हणजे या सिनेमाच्या निर्माता-दिग्दर्शकाला याविरोधात नोटीस पाठवली आहे.

श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. खुद्द प्रशांत मंबुली यांनी याबाबतही माहिती दिलीय. तसंच आपणही याला कायदेशीर पध्दतीने उत्तर देऊ, असे मंबुली यांनी स्पष्ट केल्याचे समजते. तसंच हा सिनेमा श्रीदेवींच्या जीवनावर आधारित नसून एकाच वय्कतीसारखी इतरांचीसुध्दा नावे असू शकतात असे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांनी सांगितले आहे.

दुबईत बाथटबमधील पाण्यात बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. बोनी कपूर यांनी यावर आक्षेप घेतला असून या सिनेमाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

https://youtu.be/p7m0zhKI_bo

एकूणच काय तर अभिनेत्री प्रिया प्रकाशचा बॉलिवूड पदार्पणातील पहिलाच सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive