By  
on  

आयुष्मानची पत्नी बनली दिग्दर्शिका,सिनेमात झळकणार माधुरी आणि सयामी?

बॉलिवुडमधला गुणी आणि आता आघाडीचा अभिनेता अशी ओळख असलेला आयुष्मान खुराना याची पत्नी तहिरा लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करतेय. 2018 हे वर्ष आयुष्मान आणि तहिरासाठी भरपूर आनंद व यश देऊन गेलं. आयुष्मानचे अंधाधुन आणि बधाई हो या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि सोबतच प्रेक्षकांच्या मनावर राज्यसुध्दा केलं. पण हा यशाचा आनंद साजरा करताना ह्यात गालबोट लागलं ते तहिराच्या ब्रेस्ट कॅन्सरचं.

तहिरा गेले काही महिने यावर केमोथेरीपीचे उपचार घेत होती. पण आता तिची केमोथेरेपी पूर्ण झाली असून ती आत्ता सर्वसामान्य आयुष्य जगतेय. म्हणून ती लवकरच आपल्या दिग्दर्शनाकडे वळतेय. तिचा पहिला सिनेमा दोन महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. महत्त्वाचं म्हणजे या तिच्या दिग्दर्शकीय डेब्यू सिनेमात माधुरी दिक्षीत आणि ‘माऊली’फेम अभिनेत्री सयामी खेर झळकणार अशा चर्चा आहेत.

सध्या या सिनेमाच्या प्रोजेक्टचं नाव शर्मा जी की बेटी असं ठेवण्यात आलं आहे. या प्रोजेक्टसाठी खास दोन वयोगटाच्या अभिनेत्रींची कथानकानुसार आवश्यकता होती. सूत्रांनुसार मेकर्सनी मागच्या वर्षीपासूनच माधुरीसोबत या प्रोजेक्टसंदर्भात बातचित केली आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार असून यंदा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये या सिनेमाच्या प्रोजेक्टला सुरुवात होईल.

Recommended

PeepingMoon Exclusive