By  
on  

कंगनाच्या 'मणकर्णिका- द क्वीन ऑफ झांशी'ची राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रीनींग

बॉलिवूड क्वीन कंगना रानौतचा बहुचर्चित सिनेमा 'मणकर्णिका- द क्वीन ऑफ झांशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वीच 18 जानेवारील झाशीच्या राणीचा रणसंग्राम पडद्यावर उलगडणा-या या सिनेमाची स्पेशल स्क्रीनींग राष्ट्रपती भवन येथील कल्चर सेंटरमध्ये पार पडली. राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी हा सिनेमा पाहिला आणि अभिनेत्री कंगना रानौत व सिनेमाच्या संपूर्ण टीमचा गौरव केला.

या स्पेशल स्क्रीनींगला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरुन या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1086280793486327808

इंग्रजांच्या जुलमी राजवटीला मोडून काढणा-या झाशीच्या राणीचा इतिहास आपल्याला आगामी मणकर्णिका द क्विन ऑफ झांसी सिनेमात अनुभवता येणार आहे. एका आक्रमक आवेशात मर्दानी झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखत कंगना चपखल बसलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हातात तलवार घेऊन ब्रिटींशाविरुध्द लढा देण्यासाठी ती पूर्णपणे सज्ज झाली आहे.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारी 2019  रोजी  प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive