By  
on  

'टोटल धमाल'च्या ग्रॅण्ड लॉंचची तयारी

'टोटल धमाल'च्या ग्रॅण्ड ट्रेलर लॉंचची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक कलाकारांची मांदियाळी असलेल्या या सिनेमातील तयारीचा एक फोटो नुकताच पिपींगमूनच्या हाती आला आहे. यावेळी या सिनेमागृहाच्या आवारात मोठमोठ्या विविध रंगाच्या गाड्या पाहायला मिळतायत.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाच्या पोस्टरमध्ये कलाकारांची धमाकेदार अशी मोठी फौज दिसत आहे. या पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे आहे तो अजय देवगण. अजयने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की ‘आज पासून केवळ टोटल धमाल होणार! ट्रेलर २१ जानेवारीला.’ या सिनेमाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दिक्षीत ही सुपरहिट जोडी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र झळकतेय.

या पोस्टरमध्ये अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अरशद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा दिसून येत आहेत. हा सिनेमा २२ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive