By  
on  

कंगनाच्या 'तनू वेड्स मनू'चा येतोय तिसरा भाग

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतच्या बहुचर्चित मणकर्णिका ‘द क्वीन ऑफ झांशी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची सर्वत्र उत्सुकता सुरु आहे. अशातच आत्ता कंगनाने तिच्या चाहत्यांना आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. कंगना लवकरच ‘तनू वेड्स मनू’चा 3 रा भाग घेऊन येत आहे.

२०११साली आलेला ‘तनू वेड्स मनू’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर २०१५ साली आलेला या सिनेमाचा सिक्वल तनू वेड्स मनू रिटरने तोही प्रचंड सुपरहिट ठरला. आता तब्बल चार वर्षानंतर या सिनेमाच्या 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आनंद राय यासंदर्भात लवकरच औपचारिक घोषणा करतील असं कंगना म्हणाली.

एका मुलाखती दरम्यान कंगनाला तु दग्दर्शक आनंद एल राय यांचा झिरो सिनेमा पाहिला का असं विचारल्यावर ती म्हणाली, सध्या मी मणकर्णिकामध्ये खुप व्यस्त आहे. त्यामुळे मला वेळ मिळाला नाही. पण आम्ही लवकरच तनू वेड्स मनूचा तिसरा भाग घेऊन परततोय.

तसंच यंदा कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्ष कंगनासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कोणते सिनेमे कंगनाच्या पारड्यात सुपरहिटचं माप टाकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive