By  
on  

'गली बॉय'चं नवीन नवीन गाणं,‘मेरे गली में’

रणवीर सिंह आणि आलिया भट या जोडीचा ‘गली बॉय’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणा-या आणि झोपडपडपट्टीतील बिकट परिस्थितीमध्ये राहणा-या 26 वर्षीय डिव्हाईन या धारावीतील रॅपर तरुणाच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. या तरुणाची भूमिका रणवीर साकारतोय. अपना टाईम आएगा हे सिनेमातील गाणं यापूर्वी जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं. आता या सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘मेरे गली में’ असे बोल असलेल्या या गाण्यात रणवीर एक हटके अंदाजात पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे हे गाणंदेखील रॅप साँग प्रकारात मोडणारं आहे. म्हणूनच आजच्या तरुणाईमध्ये हे गाणं आणखी लोकप्रिय होत आहे. महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात रणवीरसोबत डिव्हाइनदेखील झळकला आहे. हे गाणंसुध्दा डाब शर्मा आणि डिव्हाईनने कंपोज केलं आहे आणि रणवीरने त्याचा आवाज दिला आहे. या गाण्यातसुध्दा रणवीरचा उत्साह नेहमीप्रमाणे ओसंडून वाहताना दिसत आहे.

https://youtu.be/pGmbUdf6lEM

‘गली बॉय’ हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाइन डे ला रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive