By  
on  

आदित्य पांचोली पुन्हा अडचणीत, या व्यक्तीने त्याच्याविरोधात केली पोलिसात तक्रार

अनेक विवादांशी जवळचं नातं असलेला अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुंबईमधील एका कार मेकॅनिकने जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्द्ल आदित्य पांचोली विरोधात गुन्हा नोंदवला आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये मौसिम राजापकर या तरुणाने ही तक्रार नोंदवली आहे.

१० मार्च २०१७ मध्ये आदित्यने मेकॅनिक मौसिमकडून कार दुरुस्ती आणि मॉडिफिकेशनचं काम करून घेतलं होतं. याचा खर्च जवळपास २ लाख ८२ हजार १८५ रुपये इतका आला. यावर आदित्यने कार चालवून मग पैसे देणार असं कबूल केलं होतं. कार दिल्यानंतर मौसिमने पैशाची मागणी केली. त्यासंदर्भात आदित्यचा पाठपुरावाही केला. पण आदित्यने त्याला उडवाउडवीची उत्तरं देत जीवे मारण्याची धमकी दिली.

https://twitter.com/ANI/status/1087368678130081794

Recommended

PeepingMoon Exclusive