कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननची ‘लुका छुपी’ पाहिली का?

By  
on  

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या भलताच फॉर्मात आहे. नव्या फळीतल्या कार्तिककडे सध्या अनेक सिनेमांचे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे तो आता हळूहळू बॉलिवूडमध्ये आपला जम बसवू लागला आहे. त्याचा आगामी सिनेमा ‘लुका छुपी’चं पहिलं पोस्टर त्याने नुकतंच शेअर केलं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत हा लपाछपीचा खेळ अभिनेत्री क्रिती सेनन खेळणार आहे.

‘लुका छुपी’ सिनेमाच्या या पहिल्या-वहिल्या पोस्टरवर कार्तिक आणि क्रितीची जबरदस्त केमिस्ट्री रंगलेली दिसतेय. तर त्यांच्यामागे त्यांना दाराआड पाहणा-य इतर व्यक्तिरेखासुध्दा मजेशीर वाटतायत. या पोस्टरवरुन तरी हा एक कौटुंबिक विनोदी सिनेमा असेल असा, अंदाज व्यक्त होत आहे.

स्त्री आणि हिंदी मिडीयमसारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणा-या मडॉक फिल्म्सने याच्या निर्मितीची धुरा सांभाळलीय. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘लुका छुपी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘लुका छुपी’ या पोस्टरवर एक कॅप्शनही देण्यात आलं आहे, ‘पकड़े जाएंगे या सबको देंगे चकमा ?’ पण हे नक्की काय आहे, याचा उलगडा उद्या ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच होईल.

https://twitter.com/TheAaryanKartik/status/1087917206162284545

येत्या 1 मार्च रोजी कार्तिक आणि क्रिती या जोडीचा ‘लुका छुपी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share