By  
on  

राष्ट्रभक्त बाळासाहेब ठाकरे हिंदुस्थानाच्या कायमच स्मरणात राहतील : कंगना राणावत

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतने आपण केवळ रील लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही क्वीन असल्याचं दाखवून दिलं आहे. कंगनाने शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांना एका व्हिडिओतून आदरंजली वाहिली आहे. यावेळी जारी केल्या व्हिडिओमध्ये  ‘राष्ट्रभक्त बाळासाहेब ठाकरे हे हिंदुस्थानाच्या नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम’ असं म्हणत कंगनानं आदरांजली वाहिली आहे. याशिवाय संपूर्ण मणिकर्णिका टीमकडूनही कंगनाने बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

विशेष म्हणजे कंगनाचा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि ठाकरे हे दोन बायोपिक एकाच दिवशी म्हणजे २५ जानेवारीला रिलीज होत आहेत. त्यामुळे हे दोन्ही सिनेमे एकप्रकारे प्रतिस्पर्धीच आहेत. कंगनाच्या मणिकर्णिला ठाकरेचं तगडं आव्हान असणार आहे.

कंगना सिनेमा रिलीजची तारीख बदलेल का अशी चर्चा बॉलिवूडध्ये होती. पण कंगनाने या चर्चांना विराम देत मणिकर्णिकाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली नाही. त्यामुळे हे दोन्ही सिनेमे २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहेत.

https://twitter.com/PeepingMoon/status/1087971242290933760

Recommended

PeepingMoon Exclusive