पाहा कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या 'लुका छुपी'चा धमाकेदार ट्रेलर

By  
on  

लग्न म्हणजे दोघांचं निलन नसतं तर अवघ्या दोन कुटुंबाना यानिमित्ताने एकोप्याने नांदावं लागतं. पण या गोष्टीत जर अनेक वेडेवाकडी वळणं आली तर काय धम्मला उडले. अशाच धमाकेदार कथानकावर बेतलेल्या कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन या जोडीचा लुका छुपी या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे.

कार्तिक आणि क्रिती साकारत असलेल्या तरुण व्यक्तिरेखांना लिव्ह इनचं थ्रील अनुभवायचं असतं. पण त्यांची कुटूंबसंस्कृतीला ही बाब समजूनच घेऊ शकत नाही म्हणून ही जोडी मग आपण लग्न केल्याचा बनाव रचतात आणि मग तेव्हा काय गैरसमजांची धम्माल घडते हे आपल्याला जर अनुभवायचं असेल तर लुका छुपी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल.

स्त्री आणि हिंदी मिडीयमसारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणा-या मडॉक फिल्म्सने याच्या निर्मितीची धुरा सांभाळलीय. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘लुका छुपी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

https://youtu.be/-JLewvWBkCw

येत्या 1 मार्च रोजी कार्तिक आणि क्रिती या जोडीचा ‘लुका छुपी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share