By  
on  

इशान खट्टर आहे या आजाराने ग्रस्त, चाहत्यांसोबत केलं आजाराचं नाव शेअर

एखाद्या स्टारकिडने पदार्पणात यश मिळवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण इशान खट्टरने पदार्पणातच धडक या सिनेमातून आपली दखल घ्यायला भाग पाडलं. पहिला सिनेमा यशस्वी होताच त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलही चर्चा सुरु झाली. पण इशान सध्या आहे कुठे याचं उत्तर मात्र त्यानेच दिलं आहे.

इशान सध्या लाईमलाईट मध्ये नसण्याचं कारण आहे कांजिण्या (चिकन पॉक्स). इशान सध्या चिकन पॉक्सच्या विळख्यात अडकला असून घरी विश्रांती घेत आहे. त्यानेच ही खबर सोशल मिडियावरून चाहत्यांना दिली. त्यामुळे इशान कुठे आहे असा सवाल करणा-या चाहत्यांना उत्तर मिळालं आहे. इशान सध्या विश्रांती घेत असून लवकरच बरा होईन अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

इशान अलीकडेच भाऊ शाहीदसोबत कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये दिसला होता. त्यावेळी त्याच्या उत्तरांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता इशानचे चाहते त्याच्या लवकर बरं होण्याची वाट पहात आहेत.

https://twitter.com/StarWorldIndia/status/1081951024200454144

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive