By  
on  

आयुष्मान खुराणासाठी कोणता सिनेमा आहे सगळ्यात खास, ट्वीट करून दिलं उत्तर

आयुष्मान खुराणा हे नाव अनेक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांसोबत जोडलं गेलं आहे. पठडीपेक्षा वेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणून आयुष्मान खुराणा ओळखला जातो. आयुष्मानने अलीकडेच त्याच्या सगळ्यात खास सिनेमाविषयी सांगितलं. विकी डोनर संदर्भातील ट्वीटला उत्तर देताना आयुष्मान म्हणतो, पहिला सिनेमा नेहमीच खास असतो. या सिनेमाची टीमही खास असते. या सिनेमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट खास असते.’

हा सिनेमा २०१२साली रिलीज झाला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केलं होतं. स्पर्म डोनेशनवर आधारित असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात यामी गौतम आणि अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आयुष्मान सध्या ड्रीम गर्ल सिनेमाच्या शुटिंमध्ये व्यस्त आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive