By  
on  

‘गली बॉय’ सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज, रणवीर विचारतोय ‘क्यु ये दुरी’

रणवीर सिंगसाठी मागील वर्ष खास होतं. २०१८मध्ये रणवीर पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळ्यांवर रणवीरने यशाचा अनुभव घेतला. आगामी काळात रणवीरचा गली बॉय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या टीजरने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती यापूर्वीच मिळवली आहे.

https://twitter.com/RanveerOfficial/status/1089766119752126464

या सिनेमातील आणखी एक रॅप सॉन्ग रसिकांच्या भेटीला आलं आहे.  ‘कोई मुझको यूं बताए, क्‍यों ये दूरी और मजबूरी’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणंही रणवीरने गायलं आहे. ऋषी रिचने गाणं संगीतबद्ध केलं आहे तर जावेद अख्तर आणि डिव्हाईनने याचे बोल लिहिले आहेत. समाजातील दोन घटकांमध्ये विभागलेल्या विषमतेवर हे गाणं बोट ठेवतं. गरीबीमुळे अनेकांना आपली स्वप्नं पूर्ण करता येत नाही. रणवीरने हे वास्तव त्याच्या गाण्यातून मांडलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=QPGmwRNkffchttps

Recommended

PeepingMoon Exclusive